आता उपायुक्त घेणार रेशन दुकानदारांच्या बैठका
By Admin | Updated: January 16, 2016 23:16 IST2016-01-16T23:12:13+5:302016-01-16T23:16:17+5:30
हिंगोली : जिल्ह्यात शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांच्या आधार लिकिंगच्या कामासाठी आता उपायुक्त पुरवठा वर्षा ठाकूर यांची बैठक १८ जानेवारी रोजी आयोजित केली.

आता उपायुक्त घेणार रेशन दुकानदारांच्या बैठका
हिंगोली : जिल्ह्यात शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांच्या आधार लिकिंगच्या कामासाठी आता उपायुक्त पुरवठा वर्षा ठाकूर यांची बैठक १८ जानेवारी रोजी आयोजित केली. दिवसभर सर्वच तालुक्यांतील आधारचे प्रमाण कमी असलेल्या दुकानदारांची बैठक घेणार आहेत.
यात सकाळी हिंगोलीपासून सुरुवात झाल्यानंतर वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा अशा बैठका चालतील. यात सेनगाव तालुक्यातील २५ दुकानांचा समावेश आहे. सेनगाव, लिंगदरी, वटकळी, रेपा, बरडा, धानोरा ब., बोरखेडी, वायचाळ पिंप्री, जयपूर, रिधोरा, वाघजाळी, सुकळी बु., वाघजाळी, नानसी, सवना, सुलदली, तपोवन, पुसेगाव, खुडज, धोत्रा, केंद्रा खु. या गावांचा समावेश आहे.
वसमतमध्ये शहरातील दुकानांसह कोर्टा धुमाळ, खंदारबन, मुडी, सुनेगाव, रेणकापूर, लोण बु., हट्टा, खांडेगाव, अकोली, दारेफळ, गणेशपूर, थोरावा, कोर्टा, पूर्णा कारखाना अशा २९ दुकानांचा समावेश आहे. औंढ्यातही शहरासह अजरसोंडा, जावळा बाजार, येळी, वडचुना, तामटीतांडा, सिरळा तांडा, शिरडशहापूर, सावळी तांडा, लाख आदी गावांचा समावेश आहे.
हिंगोलीतही शहरासह खडकद बु., लोहगाव, पळसोना, पाटोंदा, पिंपळा त.बासंबा, सागद, सांडस त.बासंबा, तिखाडी, वऱ्हाडी, येहळेगाव हटकर, नौखा, धोतरा, चोरजवळा, अंधारवाडी, खंडाळा, बळसोंड, अठरवाडी अशा २८ दुकानांचा समावेश आहे.
कळमनुरी तालुक्यातील घोडा, चिखली, देवदरी, गंगापूर, कांडली, कान्हेगाव, कोंढूर, कुंभारवाडी, मोरवड, मुंढळ, नरवाडी, साळवा, शेनोडी, टाकळी क. वारंगा फाटा, आखाडा बाळापूर, मसोड आदी २१ गावांतील दुकानदार बोलावले आहेत.