बोर्डीकर-भांबळेच्या सभांनी प्रचार थंडावला
By Admin | Updated: October 13, 2014 23:34 IST2014-10-13T23:29:33+5:302014-10-13T23:34:29+5:30
जिंतूर : काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर व राकाँचे विजय भांबळे यांनी प्रचारसभा घेऊन तसेच भाजपा सेनेच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांना पाठीशीे उभे राहण्याचे आवाहन केले़

बोर्डीकर-भांबळेच्या सभांनी प्रचार थंडावला
जिंतूर : काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर व राकाँचे विजय भांबळे यांनी प्रचारसभा घेऊन तसेच भाजपा सेनेच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांना पाठीशीे उभे राहण्याचे आवाहन केले़
जिंतूर- सेलू मतदारसंघामध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करीत मतदारांना आवाहन केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी दादा शरीफ यांच्या दुकानासमोर प्रचारसभा घेऊन जिंतूर शहरातील नागरिकांना काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तर राकाँचे उमेदवार विजय भांबळे यांनी भोगाव, बोरी, सेलू या ठिकाणी मोठ्या सभा घेऊन राकाँच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचे राम खराबे पाटील यांनी पदयात्रा काढून व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. भाजपाचे संजय साडेगावकर यांनी पदयात्रा काढून बाजारपेठ पिंजून काढली. जिंतूर- सेलू मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या महिला आघाड्यांनीही जिंतूर शहर व परिसरात बैठका घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)