शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत बैठक

By admin | Updated: February 9, 2016 00:23 IST

जालना : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक बांधकाम असलेल्या स्थळांसंदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात

जालना : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक बांधकाम असलेल्या स्थळांसंदर्भात जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, अनधिकृत बांधकामा संदर्भात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, लोकमान्यता आदी विषयी पोलिसांचा अहवाल, विकास नियंत्रण नियमावली आणि विकास आराखडा इत्यादीच्या दृष्टीने पोलिस, टाऊन प्लॅनर व संबंधित भूधारक यांची संमती आदी तातडीने प्राप्त करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच अनधिकृत धार्मिक स्थळांच्या नियमितीकरण, निष्कासनाचा प्रारु प कृती आराखडा जिल्हास्तरीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येऊन याबाबतीत कोणाला आक्षेप किंवा हरकती दाखल करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश नायक यांनी दिले. या संदर्भात चर्चा करण्यासाठी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजनही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी केल्या. यावेळी जालन्याचे उप विभागीय अधिकारी चिंचकर, अंबडचे श्रीमंत हारकर, भोकरदनचे लक्ष्मी नारायण मिश्रा, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.पी. काकडे, पोलीस निरीक्षक ए.के. घुले, न.प. उपमुख्याधिकारी मुखेडकर, तहसीलदार ज्योत्स्ना धुळे, नायब तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.