शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’वर मंत्रालयात उद्या बैठक

By admin | Updated: July 7, 2015 00:55 IST

औरंगाबाद : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने समांतर जलवाहिनीच्या ठरावाबाबत ८ जुलै रोजी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे

औरंगाबाद : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने समांतर जलवाहिनीच्या ठरावाबाबत ८ जुलै रोजी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या बैठकीला मनपाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. मनपातील सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. मनपाच्या २० जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीला डीआय पाईपऐवजी स्वस्तातील एचडीपीई पाईप टाकण्याची मुभा देणारा ठराव कायम करण्यात आला. भाजप पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध दर्शविल्यानंतरही महापौरांनी हा विरोध डावलत ठराव कायम केला. त्यामुळे दुखावलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी २५ जून रोजी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा ठराव विखंडित करण्याची मागणी केली. . या बैठकीला मनपाच्या संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या दालनात होणाऱ्या या बैठकीचे पत्र सोमवारी सायंकाळी मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी विनायक चव्हाण यांनी मनपा आयुक्तांना पाठविले आहे.बैठकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सोमवारी मनपाच्या अधिकाऱ्यांना मुंबईत बोलाविले होते. त्यानुसार मनपा आयुक्त प्रकाश महाजन, शहर अभियंता सखाराम पानझडे आणि कार्यकारी हेमंत कोल्हे हे सर्वसाधारण सभेतील ठरावाचा अहवाल घेऊन मुंबईत दाखल झाले. बैठकीलाही हे अधिकारी असतील.