मराठवाड्यातील विविध समस्यांवर आज बैठक

By Admin | Updated: June 23, 2016 01:33 IST2016-06-23T00:55:42+5:302016-06-23T01:33:07+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १० जूनपर्यंत पीककर्ज देण्याची डेडलाईन ३१ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना दुष्काळामुळे ठप्प झाल्या आहेत.

Meeting today on various issues of Marathwada | मराठवाड्यातील विविध समस्यांवर आज बैठक

मराठवाड्यातील विविध समस्यांवर आज बैठक


औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १० जूनपर्यंत पीककर्ज देण्याची डेडलाईन ३१ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना दुष्काळामुळे ठप्प झाल्या आहेत. पीककर्ज वाटपासाठी बँका पुढाकार घेत नाहीत. यंदा पुन्हा कृत्रिम पावसासाठी अर्थ नियोजन आहे काय? या व इतर अनेक प्रश्नांना उद्या २३ जून रोजी सकाळी ११ वा. विभागीय पातळीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
बैठकीत बँकांना करण्यात येणारा पतपुरवठा आणि मराठवाड्यातील दुष्काळी नियोजन याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. बँकांना पीककर्जासाठी ९ हजार कोटी तर पीक विम्यापोटी सुमारे ४ हजार कोटी मराठवाड्यात लागणार आहेत. त्यातच ग्रामीण बँकेने शासनाकडे १५०० कोटींची मागणी केलेली आहे. राष्ट्रीय बँका कर्जपुरवठा करण्यासाठी पुढे येत नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा यंदा वाईट झालेली आहे. याबाबत शासन काय निर्णय घेणार आहे.
याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलेले आहे. २ जुलै रोजी ‘एकच लक्ष्य २ कोटी वृक्ष’ ची मोहीम राबविण्यावरच शासनाचा भर आहे. त्यासाठी मुनगंटीवार १७ जून रोजी शहरात आले होते. त्यादिवशी त्यांनी मराठवाड्यातील विविध समस्यांप्रकरणी कुठलेही उत्तर देण्याचे टाळले होते.

Web Title: Meeting today on various issues of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.