शाळा प्रारंभ व प्रवेश प्रक्रियेसाठी बैठक
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:01:52+5:302014-06-15T00:35:45+5:30
देगलूर : शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील शाळा प्रारंभ कार्यक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी देगलूर तालुका जि. प. व खाजगी मुख्याध्यापकांची बैठक

शाळा प्रारंभ व प्रवेश प्रक्रियेसाठी बैठक
देगलूर : शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील शाळा प्रारंभ कार्यक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी देगलूर तालुका जि. प. व खाजगी मुख्याध्यापकांची बैठक वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी यांच्या अध्यक्षतेखाली १३ व १४ जून रोजी पार पडली.
प्रास्ताविक वाय. व्ही. कोलमकर यांनी केले. त्यानंतर शि.वि. अधिकारी हमीद दौलताबादी यांनी केंद्र शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ (आरटीईजी) सविस्तर माहिती देवून १६ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये तालुक्यातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही बालक शाळा प्रवेशपासून वंचित राहू नये. शाळा परिसर, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आदि व्यवस्था करणे, प्रभातफेरी काढून शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करणे, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप करणे, लक्ष्यवेधी नमस्काराबाबत मुलांना मार्गदर्शन करणे, आर.टी.ई.नुसार एस.सी., एस.टी.च्या मुलांना २५ टक्के प्रवेश देणे, प्रवेश देतेवेळी कोणतीही चाळणी परीक्षा घेवू नये, प्रवेशासाठी डोनेशन आकारण्यात येवू नये, अशा प्रकारच्या आवश्यक सूचना केल्या. डी. एम. नाईक, प्रदीप कुलकर्णी, डी.सी. कांबळे यांनी विचार मांडले. याप्रसंगी मुख्याध्यापक मकबुल, मुख्याध्यापक यशवंत गजभारे, मुख्याध्यापक पुरमवार, भालाधरे, मुख्याध्यापक रेड्डी, बालाजी दुडलेवार, कोलमकर, दत्ता पांचारे, मुख्याध्यापक बालाजी राठोड यांच्यासह तालुक्याच्या जि. प., खाजगी शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)