अर्ध्या तासात गुंडाळली स्थायी समितीची सभा

By Admin | Updated: December 31, 2016 00:21 IST2016-12-31T00:20:33+5:302016-12-31T00:21:09+5:30

जालना : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा गतवर्षीचा कोट्यवधी रूपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे.

Meeting of standing committee wrapped in half an hour | अर्ध्या तासात गुंडाळली स्थायी समितीची सभा

अर्ध्या तासात गुंडाळली स्थायी समितीची सभा

जालना : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा गतवर्षीचा कोट्यवधी रूपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जि.प. तील १२ विभागांकडे पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांचे काय नियोजन केले याची माहिती पहिल्यांदा सभागृहाला देण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. परंतु सत्ताधाऱ्यांना ती देता आली नसल्याने संतप्त सदस्यांनी अर्धा तासात सभा गुंडाळली.
शुक्रवारी जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात दुपारी अडीच वाजता स्थायी समितीची अखेरची सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, सीईओ दीपक चौधरी, अतिरिक्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कोल्हे, मुख्य लेखाधिकारी चव्हाण, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील कौसडीकर, सभापती लीलाबाई लोखंडे, राजेश राठोड, संभाजी उबाळे, सतीश टोपे, भगवान तोडावत, रामेश्वर सोनवणे, बाळासाहेब वाकुळणीकर आदीसह विविध विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अखर्चित असलेला निधी कोठे खर्च करत आहात याचे काय नियोजन केले याची सविस्तर माहिती सभागृहसमोर ठेवण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी यावेळी केली. परंतु सभागृहात विविध विभागाचे अधिकारी सभेला गैरहजर असल्याचे कारण पुढे करत सत्ताधाऱ्यांनी असे नियोजन आत्ताच सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले. परंतु कोट्यवधी रूपयांचे नियोजन न झाल्यास आचार संहितेमध्ये विकासाचे कामे करता येणार नाही. याचे भान सत्ताधाऱ्यांना आहे की नाही असा संतप्त सवाल सदस्यांनी यावेळी केला. दलितवस्तीचे २० कोटी रूपये आणि ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हानियोजन समितीने दिलेले ६ कोटी रूपये अद्यापही अखर्चित आहेत. याचे कुठलेही नियोजन नसल्याचे सदस्यांनी आरोप केला. नियोजन झाले असे सत्ताधारी म्हणत असले तर काय नियोजन केले हे समोर ठेवण्याची मागणी सदस्यांनी केली परंतु सत्ताधाऱ्यांना नियोजन सभागृहासमोर ठेवता आले. त्यामुळे सभा अधार् तासातच गुंडाळली. अनेक विषयांवर चर्चाच होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of standing committee wrapped in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.