रामदास कदम यांच्या सभेकडे लागले लक्ष
By Admin | Updated: March 26, 2016 00:54 IST2016-03-26T00:42:43+5:302016-03-26T00:54:15+5:30
उदगीर : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उदगीरमधील वादग्रस्त सभेनंतर त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम हे आज उदगीरमध्ये सभा घेत आहेत़

रामदास कदम यांच्या सभेकडे लागले लक्ष
उदगीर : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उदगीरमधील वादग्रस्त सभेनंतर त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम हे आज उदगीरमध्ये सभा घेत आहेत़ या सभेचे नामकरणही ‘भारत माता की जय’ जयघोष सभा असे करण्यात आले आहे़ ओवेसी यांचा व त्यांच्या वादग्रस्त विधानाचा ते या सभेत कसा समाचार घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़
उदगीरच्या जिल्हा परिषद मैैदानावरुन ओवेसी यांनी १३ मार्च रोजी ‘भारत माता की जय म्हणणार नाही’ असे वादग्रस्त विधान करुन देशभरात खळबळ उडवून दिली़ यावरुन खवळलेल्या शिवसैनिकांनी उदगीरच्या त्याच मैैदानावरुन ओवैैसींना उत्तर देण्याचा अट्टहास रामदास कदम यांच्याकडे धरला होता़ त्याअनुषंगाने २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कदम यांची सभा जिल्हा परिषदेच्या मैैदानावर होत आहे़ शिवसेनेकडून या सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ पोलिस प्रशासनानेही या सभेला परवानगी दिली आहे़ शिवाय, लाऊडस्पीकर तसेच सोशल माध्यमाच्या मदतीने सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे़ या सभेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, उपप्रमुख राम अदावळे, तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे, अॅडग़ुलाब पटवारी, युवा सेनेचे पप्पू वडगावे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे़