राजीनाम्यासाठी सभेच्या हालचाली
By Admin | Updated: October 31, 2016 00:46 IST2016-10-31T00:41:51+5:302016-10-31T00:46:57+5:30
औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांचा कार्यकाळ सोमवार, ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे.

राजीनाम्यासाठी सभेच्या हालचाली
औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांचा कार्यकाळ सोमवार, ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. नियमाप्रमाणे दोन्ही पदाधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभेत आयुक्तांना राजीनामा द्यावा लागतो. सर्वसाधारण सभा कधी आयोजित करावी यादृष्टीने शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. दिवाळी संपताच सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. राजीनामा दिल्यानंतर लवकरात लवकर निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
मागील आठवड्यातच शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत दिवाळीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित झाले. राजीनामाप्रकरणी मुंबईत कोणतीही बैठक घेण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २ नोव्हेंबरनंतर स्थायी समितीच्या चार सदस्यांचे पत्र घेऊन तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यावरही शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांचा विचार सुरू आहे. सर्वसाधारण सभेची तारीख लवकरच निश्चित होईल. या सभेत महापौर, उपमहापौर राजीनामा देणार आहेत. मनपा आयुक्त पदाधिकाऱ्यांचे राजीनामे विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. त्यानंतर