दसरा महोत्सवासाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:13 IST2017-08-06T00:13:57+5:302017-08-06T00:13:57+5:30
आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात जुने हिशेब सादर न करणाºयांना संधी देऊनही फायदा होत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिला.

दसरा महोत्सवासाठी बैठक
कमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आगामी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात जुने हिशेब सादर न करणाºयांना संधी देऊनही फायदा होत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिला.
यावेळी आ.तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, तहसीलदार विजय अवधाने, खाकी बाबा मठाचे महंत कमलदास बाबा, माणिकराव टाकळगव्हाणकर, शेख लाल, गणेश बांगर आदींची यावेळी उपस्थिती होती. हिंगोली येथील दसरा महोत्सव देशभर प्रसिद्ध आहे. एकशे साठपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या या महोत्सवासाठी दरवर्षी समिती स्थापन केली जाते. सोबतच विविध समित्याही असतात. मात्र या समितीचा हिशेब सादर न केल्याचा मुद्दा काही जणांनी उपस्थित केला होता. विशेषत: झुलेवाल्याने १३ लाख कमी भरल्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर खेडेकर यांनी फौजदारीचा इशारा दिला. तर यंदा अनेक बाबींत खर्चात कपात होणार असल्याचे सांगितले. यंदा समिती गाळ्याचा दर वाढविणार असून शंकरपटाचे आयोजन केले जाणार आहे.
आज झालेल्या बैठकीस सुरुवातीला आ. तानाजी मुटकुळे यांचीही उपस्थिती होती. मात्र दुसºया बैठकीला जायचे असल्याने ते निघून गेले. मात्र यापूर्वी समितीच्या झालेल्या कामकाजाची प्रोसेडिंग नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे प्रोसेडिंग ठेवण्यास सांगितले. तर नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी रामलीला मैदान पालिकेला दिल्यास तेथे एक हजार गाळे काढून दसरा महोत्सवास अडचण होणार नाही, असे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. मात्र प्रशासनाने निर्णय घेतला नाही.