हक्काच्या पाण्याबाबत ेउद्या मुंबईत बैठक
By Admin | Updated: September 29, 2015 00:43 IST2015-09-29T00:40:01+5:302015-09-29T00:43:41+5:30
उस्मानाबाद : मराठवाड्यातील अवर्षण प्रवण व दुष्काळी भागासाठी द्यावयाच्या कृष्णा खोरे प्रकल्पातील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हक्काच्या पाण्याबाबत ेउद्या मुंबईत बैठक
उस्मानाबाद : मराठवाड्यातील अवर्षण प्रवण व दुष्काळी भागासाठी द्यावयाच्या कृष्णा खोरे प्रकल्पातील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलाविल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
मध्यंतरीच्या काळात पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी सदर काम थांबले होते. ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देवून या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता मिळवून दिली. त्यानंतर प्रकल्पाअंतर्गत प्रथम प्राधान्याची कामे तातडीने हाती घेणे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठक घेण्याची विनंती सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचे ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.