काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज मेळावा

By Admin | Updated: October 2, 2016 01:12 IST2016-10-02T01:10:44+5:302016-10-02T01:12:17+5:30

हिंगोली :माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे नवा मोंढा भागात सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

Meet the Congress workers today | काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज मेळावा

काँग्रेस कार्यकर्त्यांचा आज मेळावा

हिंगोली : विधान परिषदेचे उपसभापती ना. माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी २ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथे नवा मोंढा भागात सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल ना. माणिकराव ठाकरे यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मेळाव्यात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात आ. ठाकरे, माजी मंत्री रजनीताई सातव, खा. राजीव सातव, आ. डॉ. संतोष टारफे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल हाजी इस्माईल, युवा नेते केशव नाईक यांचा आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.याचबरोबर कृउबास आखाडा बाळापूरचे माजी उपसभापती मारोतराव बेनगर, कृउबास बाळापूरचे माजी उपसभापती वैजनाथ कोल्हे, रामराव मुलगे, कैलास खिल्लारे हे देखील प्रवेश करणार आहेत.
कार्यक्रमास पक्ष निरीक्षक तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, प्रदेश चिटणीस अमर खानापूरे, प्रदेश चिटणीस अ. हाफीज, आ. अमित झनक, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. विजयराव खडसे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीता चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Meet the Congress workers today