शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औषधी भांडाराची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:28 IST

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने सुरू असून, संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ते कामालाच उशीर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करमाड येथे राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु औषधी भांडाराची उभारणी कासवगतीने सुरू असून, संरक्षक भिंत, कार्यालय इमारत, अंतर्गत रस्ते कामालाच उशीर होत आहे. परिणामी संपूर्ण औषधी भांडार कधी पूर्णत्वास जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आरोग्य विभागाने राज्याच्या मध्यवर्ती भागात राज्यस्तरीय औषधी भांडार स्थापन करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी विविध शहरांचे, गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर करमाड येथे औषधी भांडार उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी करमाड ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. चार औषधी भांडार कक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिओ व्हॅक्सीनच्या साठवणुकीसाठी किमान उणे १५ ते २५ तापमान असणे आवश्यक असते. त्यादृष्टीने औषधी भांडाराच्या इमारतीमध्ये पोलिओ व्हॅक्सीन स्टोअर राहणार आहे. अ‍ॅन्टी रेबीज सिरम, अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सीनसह सर्व प्रकारच्या व्हॅक्सीनसाठी २ ते ८ तापमान असणे आवश्यक असते. यासाठी असे स्टोअर उभारण्यात येणार आहे. औषधी भांडारमध्ये थर्ड आणि फोर्थ जनरेशनच्या अ‍ॅन्टीबायोटिकच्या साठवणुकीसाठी कक्ष राहणार आहे. यासाठी येथे १४ ते २५ तापमान राहणार आहे.याठिकाणी सलाईनसाठी एका स्टोअरचे नियोजन करण्यात आले आहे. पूर, भूकंप अशा आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा पुरवठा कमीत कमी वेळेत करणे महत्त्वाचे ठरते. त्यादृष्टीने औषधी भांडाराच्या एका एकरमध्ये हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. दोन ते तीन टप्प्यात हे काम करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात औषधी भांडाराची उभारणी होईल. परंतु पहिल्या टप्प्यातील कामाला विलंब होत आहे.

टॅग्स :medicinesऔषधंHealthआरोग्य