वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तक

By Admin | Updated: September 13, 2015 00:05 IST2015-09-12T23:51:34+5:302015-09-13T00:05:22+5:30

लातूर : डॉक्टरी व्यवसायातही माणूसपण जपता येते़ हे डॉ़ श्रीकांत गोरे यांच्या जिवनातील वास्तव चित्र असलेल्या ‘गोरेवाडी ते लातूर व्हाया पुणे’या पुस्तकात त्यांनी मांडले आहे़

Medical students guide book | वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तक

वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तक


लातूर : डॉक्टरी व्यवसायातही माणूसपण जपता येते़ हे डॉ़ श्रीकांत गोरे यांच्या जिवनातील वास्तव चित्र असलेल्या ‘गोरेवाडी ते लातूर व्हाया पुणे’या पुस्तकात त्यांनी मांडले आहे़ त्यांचे हे पुस्तक वैद्यकीय व्यावसयिक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य प्रताप बोराडे यांनी शनिवारी येथे केले़
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ़ श्रीकांत गोरे यांच्या ‘गोरेवाडी ते लातूर व्हाया पुणे’व ‘जगावेगळी बाबाई-निवडक प्रतिक्रीया’ या दोन पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते कस्तुराई मंगल कार्यालयात करण्यात आले़़ यावेळी ते बोलत होते़ मंचावर डॉ़ श्रीकांत गोरे , डॉ़ अरुंधती गोरे, महारुद्र मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती़
यावेळी प्राचार्य बोराडे म्हणाले, बाबाई सारखी माणसे आजही समाजात आहे़ जी कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ काम करतात आणि इतरांवर प्रेम करण्यासाठीच असतात़ त्यांच्या कुटुंबातील प्रेम आणि नात्यातील जिव्हाळा कसा होता़ बाबाईच्या संस्कारामुळे ते कसे घडले हे या पुस्तकात डॉ़ गोरे यांनी लिहीले आहे़ कामातून आनंद मिळतो त्यामुळे व्यवसायासोबतच सामाजिक कामात स्वत: ला झोकून दिले आहे़ पुण्यात असताना वडारवाडीत मोफत ओपीडी सुरु करून रुग्णांवर उपचार केले़ किल्लारीतील भूकंपानंतर येथील २५० रुग्णावर शस्त्रक्रिया केली़ अंधशाळा व सुधारगृहात दरवर्षी १५ आॅगस्ट रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेतात़ या सर्वबाबींचा समावेश डॉ़ गोरे यांनी आपल्या या पुस्तकात दिलेली माहिती डॉक्टरांसह वैद्यकीयक्षेत्रातील विद्यर्थ्याना मार्गदर्शक ठरणारी आहे असेही त्यांनी सांगितले़
प्रास्ताविकात डॉ़ श्रीकांत गोरे यांनी ‘गोरेवाडी ते लातूर व्हाया पुणे’व ‘जगावेगळी बाबाई-निवडक प्रतिक्रीया’ हे लेखनाची प्रेरणा कशी मिळाली ते कथन केले़ सूत्रसंचालन महारूद्र मंगळनाळे यांनी केले़

Web Title: Medical students guide book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.