वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसले राजीनामास्त्र

By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-02T00:00:40+5:302014-07-02T00:30:05+5:30

नांदेड : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु केले .

Medical officer resigns resignation | वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसले राजीनामास्त्र

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसले राजीनामास्त्र

नांदेड : महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु केले असून जिल्ह्यातील तब्बल २५० अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेचे राजीनामे राज्याध्यक्षांकडे पाठविले आहेत़ त्यात अत्यावश्यक सेवाही बंद असल्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत़
मॅग्मो संघटनेने यापूर्वीच आपल्या मागण्यांच्या संदर्भाने बेमुदत आंदोलन सुरु केले होते़ परंतु अत्यावयक सेवा मात्र सुरु ठेवण्यात आल्या होत्या़ त्यात २ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलाविले होते़ यावेळी मुख्यमंत्र्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते़ परंतु मागण्या मंजूर न झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे़
२००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पूर्वलक्ष लाभ मिळणे बाबत, निवृत्तीचे वय ६२ वर्ष करणे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे इतर अनेक मागण्यांच्या संदर्भाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे़
मंगळवारी जिल्ह्यातील २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेचे राजीनामे राज्याध्यक्षांकडे पाठविले आहेत़ विशेष म्हणजे या काळात अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती अध्यक्ष डॉ़ नीळकंठ भोसीकर, सचिव डॉ़ राजेंद्र पवार, डॉ़ प्रताप चव्हाण यांनी दिली़ (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुरळीत
वैद्यकीय अधिकारी संघटनेच्यावतीने वतीने १ जुलैपासून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पर्यायी व्यवस्था केली होती अशी माहिती जि़ प़ चे आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिली़ जिल्ह्यातील ६५ पैकी ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर संपावर न गेलेले वैद्यकीय अधिकारी, बंधपत्रित्र वैद्यकीय अधिकारी, अत्यावश्यक वैद्यकीय सेवामधील वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक दवाखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यासह आयुर्वेदिक रूग्णालयातील १० वैद्यकीय अधिकारी ही सेवा देणार आहेत़ त्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना सेवा देण्याची जि़ प़ आरोग्य विभागाने विनंती केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी दिली़ तर जिल्ह्यात ग्रामीण भागात २१ ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी बीव्हीजी इंडिया कंपनीकडून सुसज्ज संदर्भ सेवा अपघातातील व अत्यावश्यक रूग्णांसाठी उपलब्ध आहे़ या सेवेचा गरजू रूग्णांनी लाभ घेण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य सभापती चिखलीकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी केले आहे़
या कामकाजावर असेल बहिष्कार- बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, बाळांतपण, अपघात, शवविच्छेदन, साथरोगविषयक कामकाज, सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, शासकीय बैठका़
पर्यायी व्यवस्था उपलब्ध- याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ़विजय कंदेवाड म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे़ मनपा, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून मदत घेण्यात येणार आहेत़ अत्यावश्यक सेवेवर संपाचा कुठलाही परिणाम होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असल्याचेही ते म्हणाले़

Web Title: Medical officer resigns resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.