वैद्यकीय अधिकाऱ्यावर

By Admin | Updated: June 14, 2016 00:07 IST2016-06-13T23:56:06+5:302016-06-14T00:07:57+5:30

अंकुश वाघ , आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत

On the medical officer | वैद्यकीय अधिकाऱ्यावर

वैद्यकीय अधिकाऱ्यावर


अंकुश वाघ , आडूळ
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर तब्बल ७० गावांचा भार आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी येथे मुख्य डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
येथील प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सूर्यवंशी कार्यरत आहेत. सध्या या केंद्रात २ आरोग्य सहायक पुरुष, १ आरोग्य सहायक महिला, ६ आरोग्यसेविका, १ आरोग्यसेवक, १ कनिष्ठ सहायक, औषधनिर्माण अधिकारी, ४ परिचर ही पदे भरलेली असली तरी ४ आरोग्यसेवक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ वाहनचालक ही पदे रिक्त आहेत.
या केंद्राला आडूळ खु., गेवराई बु., एकतुनी, आंतरवाली खांडी, कडेठाण खु. अशी पाच उपकेंद्रे संलग्न आहेत. परिसरातील जवळपास ७० गावांतील रुग्ण उपचारासाठी तसेच महिला प्रसूती व कुटुंबकल्याण नियोजन शस्त्रक्रियेसाठी येथे येतात; परंतु येथे रात्रीच्या वेळेस वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने नाइलाजास्तव रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करीत उपचारासाठी औरंगाबाद गाठावे लागते. काही दिवसांपूर्वी एकतुनी येथील एका महिलेची वैद्यकीय उपचार लवकर न मिळाल्याने उपचाराअभावी शौचालयात प्रसूती झाली होती. १५ ते १६ हजार लोकसंख्या असलेल्या या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने त्यांची दमछाक होत आहे. मात्र, तरीही आरोग्य विभाग येथील रिक्त पदे भरण्यासाठी कोणतीही हलचाल करताना दिसून येत नाही.

Web Title: On the medical officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.