प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये

By Admin | Updated: September 14, 2014 00:22 IST2014-09-14T00:02:40+5:302014-09-14T00:22:02+5:30

औरंगाबाद : प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा सल्ला तेलंगणा व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांनी दिला.

Media should not cross the target line | प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये

प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये

औरंगाबाद : न्यायिक, वैधानिक कार्यपद्धतीचे वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा सल्ला तेलंगणा व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांनी आज येथे दिला.
माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयातर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन न्यायमूर्ती कल्याण ज्योती सेनगुप्ता यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. आर.डी. देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे उपस्थित होते. ‘प्रसारमाध्यमांद्वारा करण्यात येत असलेल्या न्यायिक व वैधानिक कार्यपद्धतीचे वार्तांकन’ हा चर्चासत्राचा विषय आहे. यावेळी न्यायमूर्ती सेनगुप्ता पुढे म्हणाले की, भारतातील प्रसारमाध्यमांचा इतिहास उत्कृष्ट आहे. त्याचा विचार करता सामाजिक व कायदेशीर बाबींचा विचार करून प्रसारमाध्यमांनी न्यायिक, वैधानिक कार्यपद्धतीबाबत वार्तांकन करताना लक्ष्मणरेषा ओलांडू नये. या चर्चासत्रात सादर होणाऱ्या विविध शोधनिबंधांच्या संपादित पुस्तिकेचे विमोचन यावेळी न्यायमूर्ती सेनगुप्ता यांच्या हस्ते झाले. चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. गव्हाणे म्हणाले की न्यायिक, वैधानिक कार्यपद्धतीविषयी वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी समन्वयाची भूमिका वठविणे अपेक्षित आहे. प्राचार्य डॉ. सी.एम. राव यांनी महाविद्यालयाची माहिती दिली, तर प्रा. बी.व्ही. परांजपे यांनी चर्चासत्राच्या विषयाची माहिती सांगितली. यावेळी नेहा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयांतील विधि शाखेचे विद्यार्थी, संशोधकांची उपस्थिती होती. उद्घाटन सत्रानंतर पहिले सत्र प्रसारमाध्यमांचे ‘संवैधानिक अधिष्ठान’, दुसरे सत्र ‘वार्तांकनाचे विविध पैलू-उदयोन्मुख प्रवाह’, तर तिसरे सत्र ‘माध्यमांची स्वायत्तता, विरुद्ध सरकारी नियंत्रण’ या विषयावर पार पडले.

Web Title: Media should not cross the target line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.