शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

एम.एस.ई.डी.सी.एल., कम्बाइन बँकर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:27 AM

एडीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एम.एस.ई.डी.सी.एल. आणि कम्बाइन बँकर्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारे स्वप्नील चव्हाण व प्रदीप जगदाळे हे सामनावीर ठरले. या दोघांप्रमाणेच युवा फलंदाज सचिन लव्हेरा व राजेश कीर्तिकर यांनीही आजचा दिवस गाजवला.

औरंगाबाद : एडीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एम.एस.ई.डी.सी.एल. आणि कम्बाइन बँकर्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अष्टपैलू कामगिरी करणारे स्वप्नील चव्हाण व प्रदीप जगदाळे हे सामनावीर ठरले. या दोघांप्रमाणेच युवा फलंदाज सचिन लव्हेरा व राजेश कीर्तिकर यांनीही आजचा दिवस गाजवला.सकाळच्या सत्रात स्वप्नील चव्हाण याने ४२ चेंडूंतच ३ षटकार व ५ चौकारांसह ठोकलेल्या ६७ धावांच्या बळावर एम.एस.ई.डी.सी.एल.ने मनपा संघाविरुद्ध २० षटकांत ६ बाद १६७ धावा ठोकल्या. सचिन पाटीलने २२ व संतोष आव्हाळे याने १७ धावा केल्या. मनपा संघाकडून कर्मवीर लव्हेराने २, तर दीपक जावळे, अल्ताफ खान व प्रवीण क्षीरसागर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सचिन लव्हेराच्या ३४ चेंडूंतील ३ षटकार व ७ चौकारांसह फटकावलेल्या ६० धावांनंतरही मनपाचा संघ १२४ धावांत गारद झाला. प्रवीण क्षीरसागरने २१ धावा केल्या. एम.एस.ई.डी.सी.एल.कडून स्वप्नील चव्हाणने ४ व कैलास शेळकेने ३ गडी बाद केले.दुसºया सामन्यात कम्बाइन बँकर्सने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. त्यांच्याकडून राजेश कीर्तिकरने २१ चेंडूंतच ४ षटकार व ५ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. प्रदीप जगदाळेने ३१ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५१, दिनेश कुंटेने २८ व जितेंद्र पेंडकरने १९ धावा केल्या. पी.डब्ल्यू.डी.कडून मनोज दाभाडेने ३ गडीबाद केले. प्रत्युत्तरात पी.डब्ल्यू.डी. स्ट्रायकर्सने ९ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून नीरज शिमरेने ३० व मनोज दाभाडेने २५ धावा केल्या. कम्बाइन बँकर्सकडून मिलिंद पाटील, प्रदीप जगदाळे, महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.