हल्ला प्रकरणी माजलगावात निदर्शने
By Admin | Updated: August 4, 2014 00:49 IST2014-08-04T00:21:14+5:302014-08-04T00:49:02+5:30
माजलगाव : भोई समाजावरील महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येथील शिवाजी चौकात रविवारी निदर्शने करण्यात आली
हल्ला प्रकरणी माजलगावात निदर्शने
माजलगाव : भोई समाजावरील महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने येथील शिवाजी चौकात रविवारी निदर्शने करण्यात आली तर शिवसेना, भाजपा, मराठा सेना व आव्हाण संघटना यांच्याकडून सदरील घटनेचा निषेध करण्यात आला.
माजलगाव येथील कॅम्प परिसरात महिला पुरुष मच्छीमारांवर माजलगाव धरणाच्या ठेकेदाराच्या गुंडानी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हल्ला केला. यात एका गर्भवती महिलेच्या पोटावर गुंडानी लाथा मारल्या होत्या. त्यामुळे पोटातील बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालया उपचार सुरु आहेत.
माजलगाव येथील ठेकेदार माणिकशहा याने पाठविलेल्या गुंडाने शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास महिला व पुरषांना मारहाण केली. राधा गणेश लिंबोर या गर्भवती महिलेच्या पोटावर गुंडानी जबर मारहाण केली होती. मारहाणीमुळे त्या महिलेचा गर्भ पोटातच दगावला. तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. या भारिपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ठेकेदाराबरोबरच पोलीस निरीक्षक अन्वर खान पठाण हे दोषी आहेत. त्यामुळे पीआय अन्वर खान व एपीआय देवकर यांना या प्रकरणी सह आरोपी करावे, सर्व आरोपिंना तात्काळ अटक करावी यासह विविध मागण्या केल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
शिवसेनेचे युवाध्यक्ष दत्ता रांजवण, मराठा सेनेचे कालीदास सोळंके यांच्यासह अन्य संघटनांनी या मारहाणीचा निषेध पत्रकान्वये केला आहे. दरम्यान, मत्सय व्यवसाय संस्था व भोई समाज या दोघातील हे भांडन असून याला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन मुबीन पठाण यांनी केले आहे. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला़
माजलगाव धरणावर १४४ कलम लागु
भोई समाज व टेंडरधारक यांच्यातील वादाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे उप-विभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी ३ ते १० आॅगस्ट या कालावधीत माजलगाव धरणावर १४४ कलम लागु केला आहे. २०० मीटरपर्यंत धरण परिसरात पाच किंवा त्या पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा आहे़ (वार्ताहर)
सहा आरोपींना कोठडी
भोई समाजाच्या महिला व पुरुषांना मारहाण केल्या प्रकरणातील सहा आरोपींना माजलगाव पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. शेख जमील शेख अन्सार, शेख बशीर शेख बुबन, शेख अजीम शेख दिलावर, शेख अखील शेख अन्सार, शेख जावेद शेख मोहोम्मद, शेख दिलावर शेख मेहमुद या आरोपींना रविवारी माजलगाव न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. गुजर यांनी ५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.