शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीमधील कंपनीच्या मेडिकल वेस्टमधील एमडी पावडरची परराज्यात तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:48 IST

या प्रकरणी पाच आरोपींना चार दिवसांची पाेलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीमधील एका फार्मा कंपनीच्या टाकाऊ औषधी रसायनातून काढण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्सची तस्करी मुंबईसह परराज्यात करण्यात येत होती. त्यामुळे भंगाराचे कंत्राट घेतलेला आरोपी कंपनीतून मेडिकल वेस्ट मार्फत ही पावडर गोदामात आणत होता. तेथून परराज्यातील ड्रग्स तस्करांकडे पुरवठा करत असल्याचे तपासात समजल्याची माहिती एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी बुधवारी न्यायालयात दिली.

न्यायालयाने मुख्य आरोपी बबन खान नजीर खान (६५), त्याची दोन मुले कलीम खान बबन खान (४१), सलीम खान बबन खान (३५, तिघेही रा. जुना बाजार), वाहन चालक शफीफुल रहेमान तफज्जुल हुसेन (४५) आणि राज रामतिरथ अजुरे (३८, दोघेही रा. उत्तर प्रदेश) या पाचही जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एनडीपीएसच्या पथकाने २१ ते २३ जून या दरम्यान साजापूर चौफुली रस्त्यावरील गोदामात छापा मारून पाच आरोपींना अटक केली. या कारवाईत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर, दोन टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीना बुधवारी एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि त्याच्या पथकाने न्यायालयात हजर केले. बागवडे आणि सरकारी वकील सुधीर बनसोडे यांनी सांगितले की, मुख्य आरोपी बबन खान हा पूर्वी मुंबईच्या गोरेगाव भागात राहत होता. त्याच्याकडे विविध औद्योगिक कंपन्यांचे भंगाराचे कंत्राट होते. त्याच्याकडे २०११ पासून मायलान फार्मा कंपनीचे भंगार उचलण्याचे कंत्राट आहे. ही कंपनी एड्स, कॅन्सर अशा गंभीर आजारावरील औषधी, गोळ्या निर्मिती करते. या कंपन्यांना रसायन बाहेर देता येत नाही. मात्र, खानच्या गोदामात छापा मारल्यानंतर तिथे कंपनीमधून आलेल्या कॅरीबॅगमध्ये गोळ्यांची पावडर असल्याचे उघड झाले. तो गुजरातसह अन्य राज्यांत पुरवठा करत होता. त्याने अनेक व्यवहार बिटकॉईन मार्फत केले.

आरोपींनी पोलिस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट का?आरोपींना वाळूज पोलिस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर