छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज तस्करांचे कनेक्शन निष्पन्न झाले आहे. विद्यार्थ्यांना ड्रग्जचे व्यसन लावून सहज उपलब्ध करुन देणाऱ्या शेख नईम शेख जमिर (५०, रा. सिल्क मिलक कॉलनी) याला एनडीपीएस पथकाने मंगळवारी घरातून अटक केली.
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची एनडीपीएस पथकाने पुन्हा एकदा तपासणी मोहिम सुरू केली आहे. निरीक्षक गीता बागवडे यांच्या सुचेनवरुन उपनिरीक्षक अमाेल म्हस्के याबाबत शोध घेत असताना नईमने नुकतेच मुंबईवरुन विक्रीसाठी ड्रग्जची तस्करी केल्याची माहिती मिळाली. अंमलदार लालखान पठाण, महेश उगले, सतिश जाधव, विजय त्रिभुवन, संदिपान धर्मे, नितेश सुंदर्डे यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या घरावर छापा टाकला. त्यात त्याच्याकडे १ किलो १८० ग्रॅम गांजा, २.२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. छाप्यापुर्वीच बहुतांश माल त्याने विक्री केला होता.
जामिनावर सुटून पुन्हा तस्करीनईमवर यापुर्वी अंमली पदार्थांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, जामिनावर सुटताच तो पुन्हा तस्करी सुरू करतो. मुंबईच्या मुख्य पेडलरकडून आणून शहरात दामदुप्पट दराने ड्ग्जची विक्री करतो. पोलिस मात्र एकदाही त्याच्या मुंबईच्या नेटवर्क पर्यंत पोहोचू शकलेले नाही.