‘एमबीए’ प्रथम सत्र पेपरफुटीची व्याप्ती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:19 IST2018-01-04T00:19:40+5:302018-01-04T00:19:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच पेपर फोडला.

‘एमबीए’ प्रथम सत्र पेपरफुटीची व्याप्ती वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच पेपर फोडला. या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे एक पान व्हॉटस्अॅपवर टाकले होते. दुसरे पान इतर परीक्षा केंद्रांवरून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने तीन अधिष्ठातांची समिती स्थापन केली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात एका परीक्षार्थीने सहाव्या मिनिटालाच प्रश्नपत्रिकेचे एक पान व्हॉटस्अॅपच्या ‘फ्यूचर मॅनेजर’ नावाच्या ग्रुपमध्ये पोस्ट केले होते. मात्र प्रश्नपत्रिकेचे दुसरे पान या विद्यार्थ्याने न टाकता ग्रुपमधील दुसºया एका सदस्याने टाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पानांवरील कोड क्रमांक वेगळा असल्याचेही उघड झाले. यामुळे प्रश्नपत्रिका एका ठिकाणाहून नव्हे तर दोन ठिकाणाहून फुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रश्नपत्रिका फोडणाºया रॅकेटची व्याप्तीही मोठी असल्याचे समोर येत आहे. यात विविध ठिकाणच्या आणि एमबीएशी संबंधित नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामुळे एमबीए पेपरफुटीची आणि रॅकेटची व्याप्ती वाढलेली आहे. शहरातील काही नामांकित महाविद्यालय सोडता इतर महाविद्यालयांमध्ये केवळ नोकरीसाठी एमबीएची पदवी हवी, यासाठी अनेकांनी प्रवेश घेतलेले आहेत.
वसंतराव नाईक महाविद्यालयातून पेपरफुटीप्रकरणी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. साधना पांडे आणि डॉ. संजय साळुंके यांची समिती स्थापन केली असल्याचे समजते. ही समिती आठ दिवसांत अहवाल देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.