शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महिलेसाठी महापौरपद आरक्षित

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

परभणी : परभणी महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.

परभणी : परभणी महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. मुंबई येथे शनिवारी महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात परभणी महानगरपालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिला सदस्याची महापौरपदासाठी वर्णी लागणार आहे. येथील नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर प्रताप देशमुख हे पहिले महापौर झाले. ६५ सदस्यांच्या या महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३०, काँग्रेसचे २३, शिवसेनेचे ८, भाजपाचे २ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. महानगरपालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. पहिल्या महापौरांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपत असून, दुसऱ्या महापौर पदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. पहिल्या महापौर पदाच्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादीकडून प्रताप देशमुख आणि काँग्रेसकडून भगवानराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने साथ दिली. एका अपक्षानेही राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकले होते. त्यामुळे ३३ मते घेऊन प्रताप देशमुख हे महापौरपदी विजयी झाले होते. आगामी काळात विधानसभा निवडणुका असून, महापौर पदाला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ३० सदस्य असून, काँग्रेस हा मनपातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत कशा पद्धतीने समिकरणे होतात, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)कोणाला मिळणार संधी...येथील महानगरपालिकेचे महापौर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागू शकते, हे आताच सांगणे कठीण आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडे इतर मागास प्रवर्गातील सहा ते सात महिला सदस्य आहेत. त्यात संगीता वडकर, सुदामती थोरात, रजिया बेगम युनूस सरवर आदींचा समावेश आहे. तर काँग्रेसमध्येही संगीता मुळे, स्वाती खताळ या महिला सदस्या ओ.बी.सी. प्रवर्गातून आहेत. त्यामुळे परभणी शहराचा दुसरा महापौर होण्याचा मान कोणाला मिळतो? हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.