महापौरांनी मागविले दस्तावेज
By Admin | Updated: July 25, 2014 00:49 IST2014-07-25T00:44:37+5:302014-07-25T00:49:34+5:30
औरंगाबाद : महापालिकेने निविदेत वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे

महापौरांनी मागविले दस्तावेज
औरंगाबाद : महापालिकेने निविदेत वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे. महापौर कला ओझा आणि सभापती विजय वाघचौरे यांनी आज सायकल खरेदीच्या दस्तावेजांची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
२३ लाख ७५ हजार २२० रुपयांच्या ६१६ सायकली आहेत. २३०० रुपये त्या सायकलची किंमत असावी. असा अंदाज असून त्या सर्व सायकली १४ लाख रुपयांत आल्या असतील. ९ लाख ४९ हजार रुपये मनपाने जास्तीचे खर्च केले की, ती सर्व रक्कम पालिकेतील यंत्रणेने मिळून स्वाहा केली. यावरून सेनेतच अंतर्गत वाद सुरू झाला आहे. २३०० रुपयांच्या किमतीनुसार सायकली खरेदी केल्या असत्या, तर अंदाजे १ हजार सायकली आल्या असत्या. तीन ते साडेतीन हजार रुपये किमतीत चांगली बॅ्रण्डेड सायकल येते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तविला.
मनपावर सायकल मोर्चा
मनपाच्या सायकल घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज हेड पोस्ट आॅफिस ते मनपा मुख्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. मनपाने खरेदी केलेल्या सायकली निकृष्ट आहेत. पुरवठादाराने मनपाची दिशाभूल केली आहे.
संजय ट्रेडिंग कंपनीला पालिकेने १५०० रुपये जास्तीचे का दिले. याची चौकशी होणे गरजेचे आहे. मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन मार्ग दणाणून सोडला.
मनविसेचे जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी यांच्यासह प्रवीण मोहिते, दीपक तुपे, विशाल आमराव, विजय बरसमवार, शुभम रगडे, आकाश खोतकर, मयूर नातेवार आदीं मोर्चात सहभाग नोंदविला.