लातूर शहर महानगरपलिकेचा आज ठरणार महापौर

By Admin | Updated: November 12, 2014 00:25 IST2014-11-12T00:14:45+5:302014-11-12T00:25:54+5:30

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असून आज मतदान होणार आहे़ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात

The mayor of Latur city city corporation decided today | लातूर शहर महानगरपलिकेचा आज ठरणार महापौर

लातूर शहर महानगरपलिकेचा आज ठरणार महापौर



लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असून आज मतदान होणार आहे़ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत हात उंच करून मतदान होईल़ काँग्रेसचे अख्तर शेख तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली इंद्राळे यांच्यात महापौरपदासाठी लढत होत आहे़ तर काँग्रेसचे कैलास कांबळे व शिवसेनेचे सुनील बसपुरे यांच्यात उपमहापौरपदासाठी लढत होणार आहे़ काँग्रेसचे स्पष्टपणे बहुमत असलेल्या मनपात दोन्ही पदांवर काँग्रेसचा विजय निश्चित असला तरी विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने मतदान होत आहे़
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेवरून प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड़ गणेश पाटील यांनी बुधवारी होत असलेल्या लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर निवडीसाठी नगरसेवकांना व्हिप बजावण्याचे अधिकार शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांना दिले आहेत़ त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिलेले महापौरपदाचे उमेदवार अख्तर शेख व उपमहापौरपदाचे उमेदवार कैलास कांबळे यांनाच मतदान करण्यासाठीचा व्हिप अर्थात पक्षादेश शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, मनपातील काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी काँग्रेस नगरसेवकांना जारी केला आहे़ मनपात काँग्रेसचे एका अपक्षासह ५० सदस्य आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, शिवसेना ६ व रिपाइंचे दोन सदस्य आहेत़
महापौर, उपमहापौर निवडीच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ९़३० वाजता काँग्रेस भवन येथे माजीमंत्री आ़ दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे़ या बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख नगरसेवकांना मार्गदर्शन करतील़ त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक मनपा सभागृहात होणाऱ्या निवड सभेला जाणार आहेत़ मनपात काँग्रेसची एकहाती सत्ता असली तरी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होत असल्याने काळजी घेतली जात आहे़
महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे़ प्रारंभी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर उमेदवार घोषित केले जातील़ १५ मिनिटे माघार घेण्यासाठी वेळ देण्यात येईल़ प्रारंभी महापौरपदासाठी व नंतर उपमहापौरपदासाठी हात उंचावून मतदान होईल़
राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपातील गटनेते मकरंद सावे यांनी मंगळवारी नगरसेवकांची बैठक घेऊन महापौरपदाच्या उमेदवार दिपाली राजेंद्र इंद्राळे व शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार सुनील बसपुरे यांना मतदान करण्याच्या सूचना केल्या आहेत़ बैठकीस नगरसेवक राजेंद्र इंद्राळे, शैलेश स्वामी, राहुल माकणीकर यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते़

Web Title: The mayor of Latur city city corporation decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.