महापौर व उपमहापौर दोघांनीही पदभार घेतला़

By Admin | Updated: November 23, 2014 00:24 IST2014-11-23T00:12:31+5:302014-11-23T00:24:11+5:30

आशपाक पठाण , लातूर स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री महापौर झाले़ महापौरपदाचा पदभार घेण्याअगोदरच त्यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा मनपा

Mayor and Deputy Mayor both took charge | महापौर व उपमहापौर दोघांनीही पदभार घेतला़

महापौर व उपमहापौर दोघांनीही पदभार घेतला़


आशपाक पठाण , लातूर
स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री महापौर झाले़ महापौरपदाचा पदभार घेण्याअगोदरच त्यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा मनपा आयुक्तांकडे दिला़ त्यामुळे सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे़ शुुक्रवारी नूतन महापौर व उपमहापौर दोघांनीही पदभार घेतला़ इथेही चर्चा मात्र स्थायी समितीचीच होती़ जातीय समीकरणे लावतच नव्या सभापतीची निवड केली जाईल. काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने पक्ष सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला वापरणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे़
विधानसभा निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर निवडीच्या विषयांवर चर्चा होत्या़ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले महापौरपद मिळविण्यासाठी इच्छुक तीन जणांनी नेत्यांकडे लॉबिंगही केली़ एकमेकांचे उणे-दुणेही काढण्याचा प्रयत्न झाला़ आपणच कसे सरस आहोत, याबाबत दूत पाठवून नेत्याला पटविण्याचा कार्यक्रमही जवळपास पंधरा दिवस चालू होता़ विधानसभा निवडणुकी अगोदरच आरक्षण जाहीर झाल्याने ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये नेत्यांनी स्पर्धा लावली़ विधानसभा निवडणुकीचा निकाल बाहेर येताच अनेकांचे प्रभाग मायनस गेल्याने आपली संधी हुकते काय? असा प्रश्न इच्छुकाला भेडसावत होता़ त्याऊपरही लॉबिंग करीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करीत महापौरपदासाठी अखेरपर्यंत रस्सीखेच केली़ दिग्गजांमध्ये लागलेल्या स्पर्धेत स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री यांना महापौरपदाची संधी मिळाली़ काँग्रेसचे संख्याबळ अधिक असले तरी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने अख्तर मिस्त्री बिनविरोध निवडून आले़ त्याचदिवशी स्थायी समितीच्या सभापतीपदी आता कोण? अशी चर्चा सुरू झाली़ नूतन महापौर मिस्त्री यांनी शुक्रवारी पदभार घेतला़ त्यामुळे आता पहिली सर्वसाधारण सभा कधी होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे़
जातीय समिकरणांंचा मेळ घालण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे आग्रह धरला आहे़ मतदानाचा अधिक टक्का असलेला समाज नाराज होणार नाही, याची दखल घेतली जाईल, अशी चर्चा आहे़
४मनपात स्थायी समितीचे सभापतीपद सर्वाधिक महत्वाचे आहे़ काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख, डॉ़ रूपाली सोळुंके, रविशंकर जाधव, अ‍ॅड़ किशोर राजुरे यांच्या नावाची चर्चा आहे़ मात्र, माजी मंत्री आ़ दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ़ अमित देशमुख सुचवितील त्यालाच स्थायी समितीच्या सभापतीपदाची संधी मिळणार आहे़
४उच्च विद्याविभुषित असलेल्या डॉ़ रूपाली सोळुंके यांच्या नावाला सभापतीसाठी संमती मिळणार असून अ‍ॅड़ किशोर राजुरे यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता मनपाच्या राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे़ ४
नूतन महापौर अख्तर मिस्त्री हे स्थायी समितीचे सभापती होते तर उपमहापौर कैलास कांबळे हे स्थायीत सदस्य होते़ दोघांनीही स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे़ त्यामुळे स्थायी समितीत काँग्रेसचे दोन सदस्य नवे येणार आहेत़

Web Title: Mayor and Deputy Mayor both took charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.