महापौरही ‘वेटिंग’वर

By Admin | Updated: November 28, 2014 01:17 IST2014-11-28T01:05:51+5:302014-11-28T01:17:46+5:30

औरंगाबाद : शहराच्या प्रथम नागरिक आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या महापौर कला ओझा या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोलावणे येते का

Mayor also on 'Waiting' | महापौरही ‘वेटिंग’वर

महापौरही ‘वेटिंग’वर


औरंगाबाद : शहराच्या प्रथम नागरिक आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या महापौर कला ओझा या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोलावणे येते का यासाठी तब्बल तीन तास उभ्या राहिल्या. यामुळे महापौरांसह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही त्रस्त झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी कसेबसे महापौरांचे निवेदन स्वीकारले.
शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर ओझा शहरासाठी शंभर कोटींचा निधी द्यावा, या मागणीचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या.
दुष्काळाच्या प्रश्नावर या ठिकाणी आमदारांची बैठक चालू होती. मुख्यमंत्री दुपारी ४ वा. अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सभागृहात गेले. ही बैठक सुमारे तासभर चालली. त्यानंतर ५ वाजण्याच्या सुमारास आमदारांची बैठक झाली. ही बैठक ६.४५ वाजेपर्यंत चालली.

Web Title: Mayor also on 'Waiting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.