शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

‘खाकी’तील माणुसकीची माऊलीला सलामी

By admin | Updated: August 13, 2015 00:23 IST

संतोष मगर , तामलवाडी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारातील गंजेवाडी रस्त्यावर महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या मृतदेहाशेजारी आढळून आलेल्या

संतोष मगर , तामलवाडीतुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारातील गंजेवाडी रस्त्यावर महिलेचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या मृतदेहाशेजारी आढळून आलेल्या एकवर्षीय मुलीला बुधवारी तिच्या पित्याच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्ंया पोलीस पथकाला पोलीस अधीक्षकांनी दहा हजारांचे रिवार्ड दिले होते. बक्षीसाची ही रक्कम या पोलीस कर्मचाऱ्यांनी या एक वर्षाच्या चिमुकलीच्या नावे एफडी करून खाकी वर्दीतील माणुसकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. गंजेवाडी शिवारात महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी या महिलेच्या प्रेताजवळ एक वर्षाची चिमुकली रात्रभर टाहो फोडत होती. आईला कवठाळल्याने तिचे कपडेही रक्ताने माखले होते. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिर्झा बेग यांनी सदर मुलीला सांभाळण्याची जबाबदारी त्यांचे सहकारी मायंदे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर सोपविली होती. मायंदे यांच्या घरातील लेकरांसोबत ही मुलगी दिवसभर रमली. या मायेपासून पोरक्या झालेल्या मुलीला पाहण्यासाठी तामलवाडीकरांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान या चिमुरडीला महिला व बालकल्याण समितीपुढे हजर केले असता, समितीने पंढरपूर येथील बालकाश्रमात तिला दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पंढरपूर येथील बालकाश्रमात ती मागील २२ दिवसांपासून राहत होती. दरम्यान या खून प्रकरणाचा पोलिसांनी तात्काळ तपासही लावला. यातील आरोपीला गजाआड करण्यात आले. सदर खून प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सदर चिमुरडीचे वडील शंकरकुमार महंतु तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ही मुलगी आपलीच असल्याचे सांगितले. त्यानुसार मुलगी पूजा हिचा ताबा मिळावा, असा रितसर अर्जही महंतु यांनी दाखल केला होता. बालकल्याण समितीने पिता सांभाळ करण्यास सक्षम आहेत का? याची चौकशी पूर्ण केल्यानंतर ११ आॅगस्ट रोजी पूजाला तिच्या पित्याच्या ताब्यात देण्याचे आदेश बालकाश्रमाला दिले. त्यानुसार बुधवारी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी, सपोनि मिर्झा बेग, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे यांच्या उपस्थितीत पूजाला तिच्या पित्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी तामलवाडी पोलिस कर्मचारी आवर्जुन उपस्थित होते. यावेळी सुरेश शिंदे यांच्यासह महेबूब पाशा शेख, महिला पोलीस कर्मचारी राजश्री जावळे, जुबेर शेख आदींची उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता पूजाला घेऊन तिचे पिता शंकरकुमार महंतु मुंबईकडे रवाना झाले. एसटी बस मध्ये बसल्यानंतर चिमुकली पूजा बसच्या खिडकीतून तिला निरोप देण्यासाठी गेलेल्यांकडे पाहत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी आश्रु अनावर झाले होते. घटनेनंतर तामलवाडी पोलिसांनी या एक वर्षाच्या मुलीचा सांभाळ केला होता. त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी तिचे पूजा असे नाव ठेवले होते. बालकल्याण समितीच्या आदेशावरून पूजाला पंढरपूर येथील बालकाश्रमात २५ जुलै रोजी पाठविण्यात आले. २७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये होता. त्यामुळे यात्रेच्या कालावधीत ही चिमुरडी आश्रमात आल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तिचे माऊली असे नामकरण केले. याच नावाने मागील २२ दिवसांपासून ती ओळखली जात होती. दरम्यान येत्या १३ सप्टेंबर रोजी पूजाचा वाढदिवस असून, नालासोपारा येथील घरात गेल्यानंतर तिचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे वडील शंकरकुमार महंतु यांनी सांगितले. कलावती महंतु या महिेलेच्या खुनाचा तपास ४८ तासात लावल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे व अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे यांच्या उपस्थितीत तपास करणाऱ्या या पोलीस पथकाला दहा हजाराचे बक्षीस देण्यात आले होते. सदर रक्कम पोलिसांनी न घेता या रकमेची एफडी पूजाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकेत ही एफडी करण्यात आली. याचे प्रमाणपत्र बुधवारी पूजाच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मिर्झा बेग, सुरेश शिंदे यांच्यासह तानाजी माने, लक्ष्मी चव्हाण, रोहिणी खोसे, राजश्री जावळे, राजेंद्रसिंह ठाकूर, ताटे, राठोड, महेबूब शेख आदींची उपस्थिती होती.