देवगाव रंगारी परिसरात मटका जोरात
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:22+5:302020-12-04T04:08:22+5:30
देवगाव रंगारी परिसरात तब्बल १६ बुकींकडून हे मटका रॅकेट चालविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात ...

देवगाव रंगारी परिसरात मटका जोरात
देवगाव रंगारी परिसरात तब्बल १६ बुकींकडून हे मटका रॅकेट चालविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षित होत असल्याने अनेकांचे संसार यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या देवगाव रंगारीतल मटक्याची दररोजची उलाढाल चार ते पाच लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. तरुण कमीत कमी २०० ते ५०० रुपयांपर्यंत मटका लावतात. विशेष म्हणजे आता बुकींकडून व्हॉटस्ॲपचा वापर होत असून, याद्वारे ग्राहकांना बुकी माहिती देत असल्याचे समोर आले आहे. हे बुकी १० टक्के कमीशनप्रमाणे आठवड्याला २० ते २५ हजार रुपये कमवत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस प्रशासन हा प्रकार कधी रोखणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.