जिल्हा नियोजन समितीसाठी मातब्बरांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:50 IST2017-08-06T23:50:01+5:302017-08-06T23:50:01+5:30

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक २२ आॅगस्टला होणार आहे

 Matilda's Fielding for District Planning Committee | जिल्हा नियोजन समितीसाठी मातब्बरांची फिल्डिंग

जिल्हा नियोजन समितीसाठी मातब्बरांची फिल्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: जिल्हा नियोजन समितीची निवडणूक २२ आॅगस्टला होणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचाय क्षेत्रातील एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. एकूणच जिल्हा नियोजन समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या नियोजनात जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या क्षेत्रातील विकास कामांसाठी नियोजन समितीवर निवडून येण्यास अनेकजण इच्छुक असतात. या वर्षी २२ आॅगस्टला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस दोन आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. नगरपालिका क्षेत्रातून काँग्रेसकडून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी अर्ज भरला. या पूर्वी काँग्रेसकडून नगरसेविका संध्या देठे, सुमन हिवराळे यांनी अर्ज भरले आहेत. नगरपरिषद क्षेत्रातून परतूरच्या नगराध्यक्षा विमल जेथलिया, भोकरदनच्या नगराध्यक्षा मंजूषा देशमुख इच्छूक असल्याचे सूत्रांनी सांगितले

Web Title:  Matilda's Fielding for District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.