मतीमंद मुलीवर कन्हेरीत बलात्कार

By Admin | Updated: August 10, 2014 02:20 IST2014-08-10T02:09:55+5:302014-08-10T02:20:45+5:30

वाशी : शाळेतून घराकडे परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीस रस्त्यावरून एका युवकाने घरात उचलून नेवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना

Maternal infant rape in the village | मतीमंद मुलीवर कन्हेरीत बलात्कार

मतीमंद मुलीवर कन्हेरीत बलात्कार




वाशी : शाळेतून घराकडे परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीस रस्त्यावरून एका युवकाने घरात उचलून नेवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना कन्हेरी (ता़ वाशी) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली़ या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी युवकास जेरबंद केले आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कन्हेरी येथील एक १० वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलगी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शाळेतून घराकडे जात होती़ त्यावेळी गावातील शिवाजी आनंदराव कदम (वय-२३) याने तिला त्याच्या घरात उचलून नेवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची आई सायंकाळी उशिरा कामावरून आल्यानंतर तिने घडला प्रकार आईस सांगितला़ सदरची घटना मुलीच्या आईने शनिवारी दुपारी वाशी पोलिसांना सांगितली़
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी शनिवारी दुपारी कन्हेरी येथील शिवाजी कदम यास गजाआड केले असून, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कदम याच्याविरूध्द वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी ढवळे हे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Maternal infant rape in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.