मातंग समाज बांधवांचा देगलुरात विराट मोर्चा
By Admin | Updated: August 23, 2014 00:47 IST2014-08-23T00:01:54+5:302014-08-23T00:47:45+5:30
देगलूर : मातंग समाजाला सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी देगलुरात २२ आॅगस्ट रोजी विराट मोार्च काढण्यात आला़

मातंग समाज बांधवांचा देगलुरात विराट मोर्चा
देगलूर : मातंग समाजाला सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी देगलुरात २२ आॅगस्ट रोजी विराट मोार्च काढण्यात आला़
पारंपरिक वाजंत्री आणि गगनभेदी घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला़ या मोर्चासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले़ आ़रावसाहेब अंतापूरकर, माजी आ़ अविनाश घाटे, जि़प़चे माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर, राष्ट्रवादीचे मारोती वाडेकर, शिवसेनेचे मच्छिंद्र गवाले, नागनाथ वाडेकर, गोपाळ टेंभुर्णे यात सहभागी झाले़ तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत स्वतंत्र आरक्षणाची आवश्यकता का आहे याची विविध वक्त्यांनी मांडणी केली़ मातंग समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या अभ्यासासाठी गठीत केलेल्या आयोगाने आपला अहवाल सरकारकडे दिल्यानंतरही काही शिफारशी स्वीकारून स्वतंत्र आरक्षण स्पष्टपणे नाकारण्यात आले़ अन्य समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली झाल्या़ त्यामुळे संघर्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या़ मातंग समाज आरक्षण कृती समितीकडून तहसीलदारांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले़
मोर्चा यशस्वीतेसाठी शंकरराव भाटापूरकर, सुभाष जांभळीकर, राजेंद्र मंडगीकर, मनोहर देगावकर, गंगाधर भुयारे, सुभाष अल्लापूरकर, अॅड़आऱडी़ सूर्यवंशी, प्रा़विश्वनाथ कंधारे, संजय गवलवाड आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)