मास्टरमार्इंड लक्ष्मीच?

By Admin | Updated: December 23, 2015 23:59 IST2015-12-23T23:14:42+5:302015-12-23T23:59:39+5:30

प्रताप नलावडे, बीड ब्लॅकमेलिंग आणि त्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील सेक्स रॅकेटमध्ये लक्ष्मीच मास्टरमार्इंड असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

Mastermind Laxmich? | मास्टरमार्इंड लक्ष्मीच?

मास्टरमार्इंड लक्ष्मीच?


प्रताप नलावडे, बीड
ब्लॅकमेलिंग आणि त्या अनुषंगाने चर्चेत आलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील सेक्स रॅकेटमध्ये लक्ष्मीच मास्टरमार्इंड असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. ते दोन मुख्याध्यापक आणि लक्ष्मी यांच्यातील जवळीक, त्या तरुणीला या दोघांच्या संपर्कात आणण्यासाठी तिची मुख्य भूमिका असल्यामुळे पोलिसांच्या संशयाची सूई आता लक्ष्मीच्या दिशेने फिरू लागली आहे.
त्या तरुणीने दोघांच्या अश्लिल चाळ्यांची क्लिप तयार करून राहूल नावाच्या साथीदारासह आपल्याला ब्लॅकमेल केल्याची तक्रार मुख्याध्यापक महादेव बजगुडे यांनी केल्यानंतर दररोज या प्रकरणाला वेगवेगळी कलाटणी मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या तरूणीला या दोन मुख्याध्यापकांच्या संपर्कात आणणारी लक्ष्मी ही बजगुडे यांच्याकडे दोन वर्षापूर्वी भाड्याने राहण्यास होती. वर्षभरापूर्वी ती औरंगाबादला नोकरीच्या निमित्ताने गेली होती. बजगुडे यांनी पोलिसांना सुरुवातीला दिलेल्या तक्रारीतही लक्ष्मीनेच त्या तरुणीच्या मोबाईलवरून आपल्याला फोन केला होता आणि तिनेच या तरुणीला तुमच्या महाविद्यालयात प्रवेश द्या, अशी गळ घातल्याची कबुली दिली आहे. तिच्याशी आपले नेहमीच मोबाईवरून बोलणे होत असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे बजगुडे आणि लक्ष्मीमधील जवळीक स्पष्ट होते.
केशव भांगे आणि त्या तरुणीमध्ये मोबाईलवरून संभाषण झाल्याचेही तपासात पुढे आले आहे. या दोघांनाही संपर्कात आणण्याची भूमिका लक्ष्मीनेच पार पाडलेली असल्याने लक्ष्मी नेमके कशासाठी असले प्रकार करत होती, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या तरुणीनेच पहिल्यांदा भांगे यांना मोबाईलवरून तुमच्या महाविद्यालयात मला प्रवेश द्या, अशी विनवणी केली होती. तिला भांगे यांचा मोबाईल नंबर देणारी लक्ष्मीच असल्याचे त्या तरूणीनेही कबूल केले आहे.
ब्लॅकमेलिंग प्रकरणाची पध्दतशीर योजना आखणाऱ्या राहूल याचीही लक्ष्मीशी ओळख असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. राहूलनेच पोलिसांना लक्ष्मी आणि तिचा प्रियकर फिरायला परराज्यात गेल्याचेही सांगितले असल्याचे समजते. त्यामुळे या दोघांमध्येही जवळीक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहूलने आणि त्या मुलीने क्लिप तयार केल्यानंतर बजगुडे याला ३९ कॉल केले असून एका कॉलमध्ये राहूलने ५० लाखाची मागणी करताना, तुम्हाला ५० लाख ही रक्कम जास्त नाही. तुमचा आम्ही सर्व्हे केला असून तुमची आर्थिक परिस्थिती आम्हाला माहिती आहे, असे म्हटले आहे.
राहूल आणि बजगुडे या दोघांची साधी ओळखही नसताना त्याला बजगुडेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती बारकाईने कशी मिळाली, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राहूलला बजगुडेसंदर्भात माहिती लक्ष्मीच देऊ शकते कारण ती त्याच्या घरी दोन वर्षे राहिली होती. त्यामुळे तिला बजगुडेच्या कुटुंबाविषयी चांगली माहिती होती, असे एकाने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले.
लक्ष्मीचा शोधल्यानंतरच पोलिसांना या प्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय आहे, हे समजू शकणार आहे. या प्रकरणात लक्ष्मीचा नेमका ‘रोल’ समजला तर संपूर्ण ब्लॅकमेलिंग प्रकरणावरच प्रकाश पडणार आहे.४
बजगुडे याने पोलिसांना दिलेल्या सुरूवातीच्या तक्रारीत क्लिप ते ब्लॅकमेलिंग प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने तक्रारीत म्हटल्यानुसार २७ नोव्हेंबरला तो स्वत: आणि आतेभाऊ गोपीनाथ पवार हे दोघे दुपारी ४ वाजता औरंगाबादला गेले. मकबरा परिसरात ते त्या तरुणीसह लक्ष्मीला भेटले. त्यानंतर सर्वांनी एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर ती तरूणी तिच्या बेगमपूर परिसरातील रुमवर गेली. दहा पंधरा मिनिटांनी लक्ष्मीने ‘ती तरुणी रुमवर या असे म्हणते’, असे सांगितले. रुमवर गेल्यावर बंद दरवाज्याआड दहा ते पंधरा मिनिटे घालवल्यानंतर अचानक दरवाजा कोणीतरी ठोठावला आणि त्यानंतर तेथून बजगुडेने भीतीने पळ काढला.
४यानंतर चार दिवसांनी त्या तरुणीने मोबाईवरून बजगुडेशी संपर्क साधला आणि राहूलने आपली अश्लिल क्लिप काढली असून त्याचे काय मॅटर आहे ते क्लोज करा, असा निरोप दिला.

Web Title: Mastermind Laxmich?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.