सोने तारण प्रकरणातील मास्टरमाइंड अटकेत
By Admin | Updated: June 12, 2017 00:23 IST2017-06-12T00:21:35+5:302017-06-12T00:23:45+5:30
जालना : जालना पीपल्स बँकेच्या बदनापूर शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला गोल्ड व्हॅल्यूअर विनायक विसपुते यास पोलिसांनी रविवारी रात्री शिवाजी पुतळा परिसरातून अटक केली.

सोने तारण प्रकरणातील मास्टरमाइंड अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पीपल्स बँकेच्या बदनापूर शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला गोल्ड व्हॅल्यूअर विनायक विसपुते यास पोलिसांनी रविवारी रात्री शिवाजी पुतळा परिसरातून अटक केली.
बहुचर्चित जेपीसी बँक सोने तारण प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने ३९ आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला.
बँकेतील गोल्ड व्हॅल्युअर व या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनायक विसपुते हा शहरातील शिवाजी पुतळा भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेसात वाजता शिवाजी चौकात सापळा लावून विनायक विसपुते यास रिक्षातून उतरताना ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, काँस्टेबल रामदास काकडे, अनिल काळे, दामोदर गवई, इंद्रजित काळेबाग, बागा गायकवाड, देवाशिष वर्मा, पूनम सुलाने यांनी ही कारवाई केली.