शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महसुलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सामुहिक रजा आंदोलन; दिवसभराच्या कामकाजावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 19:07 IST

कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय रजेमुळे पुढील सलग पाच दिवस तहसील कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहेत

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यारी दि. २८ व  २९ अशा दोन दिवसांची सामुहिक रजा टाकून आंदोलनात सहभागी ३० ऑक्टोबरला शुक्रवारी ईद असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. तर ३१ ऑक्टोबर रोजी शनिवार व १ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी

पैठण : पदोन्नतीसह विविध प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा महसुल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या दोन दिवसीय सामुहिक रजा आंदोलनात पैठण तहसील कार्यालयातील कर्मचारी बुधवारी सहभागी झाले. तहसील कार्यालयात आज एकही कर्मचारी हजर नसल्याने प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय रजेमुळे पुढील सलग पाच दिवस तहसील कार्यालयातील कामकाज बंद पडणार असून सोमवारीच कार्यालयातील कामकाजास प्रारंभ होणार आहे.

पैठण तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यारी दि. २८ व  २९ अशा दोन दिवसांची सामुहिक रजा टाकून आंदोलनात सहभागी झाले आहेत. ३० ऑक्टोबरला शुक्रवारी ईद असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. तर ३१ ऑक्टोबर रोजी शनिवार व १ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारीच पैठण तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होणार आहे. सलग ५ दिवस प्रशासकीय कामकाज ठप्प राहणार असल्याने नागरिकांना मात्र विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

आज तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले असून यात असे म्हटले आहे की, औरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नतीबाबत व प्रलंबित विभागीय, फौजदारी खटल्यातील संबंधीत अधिकारी तहसिलदार , नायब तहसिलदार , अव्वल कारकुन , महसुल सहायक, वाहन, चालक , शिपाई , कोतवाल संवर्गातील अधिकारी  कर्मचारी बाबत  लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या  मागण्या पूर्ण करणे बाबत  शासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे व मागण्या मंजुर न केल्यामुळे  दोन दिवसीय सामुहिक रजा आंदोलनात पैठण तहसील कर्मचारी सहभागी झाले असल्याचे म्हटले आहे. आंदोलनात पैठण तालुका महसूल संघटनेचे अध्यक्ष नारायण बंगले, उपाध्यक्ष सतिश घावट, यांच्यासह प्रमोद विघोतेकर, जीवन चव्हाण, एस.सी.घुनावत, श्रीमती सी.बी.कोल्हे, अरुण वादाडे,  रविंद्र टोणगे, नितीन जाधव अशोक जाधव, बालाजी कांबळे, जी.सी.माळी, एस.एस.थोटे .वसुधा बागुल, हरिश शिंदे, संदिप शेळके, अमोल पाखरे, चरणसिंग राजपूत आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagitationआंदोलनTahasildarतहसीलदार