मसिआ, स्कोडा संघ उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:21 AM2017-12-14T01:21:08+5:302017-12-14T01:21:37+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतर औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत स्कोडा संघाने लिप फास्टनर संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली.

Masiya, the skoda team in the semifinals | मसिआ, स्कोडा संघ उपांत्य फेरीत

मसिआ, स्कोडा संघ उपांत्य फेरीत

googlenewsNext
ठळक मुद्देव्हेरॉक करंडक : संदीप खोसरे, रोहन राठोड सामनावीर

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतर औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत स्कोडा संघाने लिप फास्टनर संघावर मात करीत उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत मसिआने एनएचके संघावर ५ धावांनी मात करीत सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला. अष्टपैलू कामगिरी करणारे संदीप खोसरे व रोहन राठोड हे सामनावीर ठरले.
लिप फास्टनरने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ७ बाद ९0 धावा केल्या. त्यांच्याकडून राहुल पाटीलने ४ चौकारांसह ३१, राजू मदनने १६ व इंद्रजित उढाणने १३ धावा केल्या. स्कोडा संघाकडून विजय मेहेत्रे, संदीप खोसरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. योगेश भागवत व मंगेश गरड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात स्कोडा संघाने विजयी लक्ष्य १५.२ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून संदीप खोसरेने ४१ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४९, संदीप राठोडने १३ धावा केल्या.
दुसºया सामन्यात मसिआ संघाने २0 षटकांत ६ बाद ११४ धावा केल्या. त्यांच्याकडून रोहन राठोडने २३ चेंडूंत १ षटकार व ३ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या. रोहन मोरे व हितेश पटेल यांनी प्रत्येकी २२ व राहुल शर्माने १४ धावा केल्या. एनएचकेकडून कैलास हजारे व गौरव शिंदे यांनी प्रत्येकी २, तर रोहन हंडीबाग व फरहान नेहरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एनएचके संघ ९ बाद १0९ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून गौरव शिंदेने ३७ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह ४२ व डी. वैद्य याने ३ चौकारांसह ३१ धावा केल्या. रोहन हंडीबाग १२ धावांवर नाबाद राहिला. मसिआकडून रोहन राठोड, रोहन मोरे व हितेश पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
उद्या सकाळी ८.३0 वाजता शहर पोलीस विरुद्ध एमआर इलेव्हन आणि दुपारी १२.३0 वाजता एमएसईडीसीए वि. ग्रामीण पोलीस यांच्यात उपांत्यपूर्वफेरीचे सामने रंगणार असल्याचे स्पर्धा सचिव राहुल टेकाळे यांनी कळवले आहे.

Web Title: Masiya, the skoda team in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.