शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

वाळूज उद्योगनगरीत दहा दुकाने फोडणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 5:41 PM

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव व वाळूज भागात धुमाकूळ घालत दहा दुकाने फोडणाऱ्या टोळीतील तिघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. सीसीटीव्हीमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, यामध्ये दोन सख्या भावासह एका विधीसंघर्ष मुलाचा समावेश आहे. चोरट्यांकडून २९ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव व वाळूज भागात धुमाकूळ घालत दहा दुकाने फोडणाऱ्या टोळीतील तिघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. सीसीटीव्हीमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, यामध्ये दोन सख्या भावासह एका विधीसंघर्ष मुलाचा समावेश आहे. चोरट्यांकडून २९ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

या परिसरातील वाळूज व रांजणगावात पंधरवड्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी १६ नोव्हेंबरला वाळूजला दोन मेडीकल स्टोअर्स फोडून जवळपास २० हजारांचा ऐवज लांबविला होता. यानंतर रांजणगावात २० नोव्हेंबरला एकाच रात्री सात दुकाने फोडण्यात आली. यामुळे व्यवसायिक व नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते.

आठवडाभरापुर्वी साजापूर शेख जमील यांच्या घरी घरफोडी करुन चोरट्यांनी ४ लाखांची रोकड व जवळपास २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तर बजाजनरात विष्णू मोरे यांचे घर फोडून रोख १५ हजार व जवळपास ७ तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. या चोºयांच्या सत्रामुळे व्यवसायिक व नागरिकांत असुरक्षितेचे वातावरण पसरले होते. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वस्तरावरुन टीका झाल्याने अखेर पोलीस कामाला लागले आणि शुक्रवारी तिघांना जेरबंद करण्यात आले.ताब्यात घेतलेल्या तिघांनीही अन्य तीन साथीदारांच्या मदतीने वाळूज व रांजणगावात १० दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख १५ हजार, चांदीच्या जैन, अंगठ्या, कॉस्मेटिक साहित्य इत्यादी ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सापळा रचून ताब्यात घेतलेरांजणगावात एकाच रात्री सात दुकाने फोडणारे दुचाकीस्वार चोरटे ग्रामपंचायतीने मुख्य चौकात उभारलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले होते. घटनेच्या रात्री सहा चोरटे विना क्रमांकाच्या दोन दुचाकींवरुन गावात फिरताना कॅमेºयाने टिपले होते. विशेष म्हणजे यातील एक चोरटा दिव्यांग होता. त्यामुळे पोलिसांनी या चोरावर लक्ष केंद्रीत. दरम्यान, या दिव्यांग असलेल्या संशयिताची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

फरार तिघांचा शोध सुरुपोलीस पथकाने पकडलेल्यांमध्ये गणेश पिंपळे (२६) व प्रदीप पिंपळे हे सख्खे भाऊ असून, त्यांच्याविरुध्द चोºया व लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यासमवेत दिव्यांग हा विधीसंघर्ष मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWalujवाळूज