विवाहितेला विष पाजले
By Admin | Updated: August 20, 2014 00:20 IST2014-08-19T23:58:19+5:302014-08-20T00:20:24+5:30
नांदेड : विवाहितेला मारहाण केल्यानंतर विष पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

विवाहितेला विष पाजले
नांदेड : उमरी तालुक्यातील मौजे कुदळा येथे पैशाच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण केल्यानंतर विष पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
मिराबाई नागूराव जाधव या विवाहितेला सासरच्या मंडळींनी घरबांधणी व दुचाकी घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेवून येण्याची मागणी केली होती़ त्यासाठी सासरच्या मंडळीकडून मिराबाई यांना नेहमी मारहाणही करण्यात येत होती़ दरम्यान, मिराबाई या गर्भवती असताना, चुकीचे औषध देवून त्यांचा गर्भपात करण्यात आला़
त्यानंतर १३ आॅगस्ट रोजी नागूराव रावजी जाधव, कमलबाई रावजी जाधव, संगिता गुलाब शिंदे, गुलाब बालाजी शिंदे यांनी मिराबाई यांना मारहाण केली़ त्यानंतर त्यांना जबरदस्तीने विष पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी मिराबाई जाधव यांच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध उमरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला़ (प्रतिनिधी)