चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस मारहाण
By Admin | Updated: April 3, 2015 00:38 IST2015-04-03T00:24:04+5:302015-04-03T00:38:35+5:30
परतूर: चारित्र्यावर संशय घेवून माहेराहून २५ हजार आण म्हणून एका पंचवीस वर्षीय महिलेचा छळ केल्याच्या कारणावरून परतूर पोलिसांत पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस मारहाण
परतूर: चारित्र्यावर संशय घेवून माहेराहून २५ हजार आण म्हणून एका पंचवीस वर्षीय महिलेचा छळ केल्याच्या कारणावरून परतूर पोलिसांत पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर तालूक्यातील वाहेगाव सोपारा ह. मु. वरफळ येथील एक २५ वर्षीय विवाहीता सासरी नांदत असतांना आरोपी पती दादाराव रंगनाथ वाधमारे याने सदर विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून व मोटारसायक ल घेण्यासाठी माहेरहून २५ हजार रूपये आण म्हणून मारहाण करून जिवे तारण्याची धमकी दिली. शारीरीक व मानसिक छळ केला म्हणून परतूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार दत्तात्रय मदन हे करीत आहेत.
मोटारसायकल चोरली
परतूर तालूक्यातील सातोना खु. येथील मधुकर किसनराव आकात यांची काळया रंगाची मोटारसायकल सुमारे २० हजार रूपये किमतीची दि. ३० मार्च रोजी रात्री अज्ञात चोरटयांनी चोरून नेली.
या प्रकरणी परतूर पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)