विवाहितेचा छळ करून केला खून

By Admin | Updated: November 14, 2014 00:54 IST2014-11-14T00:32:59+5:302014-11-14T00:54:17+5:30

लातूर : अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील एका विवाहितेस खून केल्याची घटना बुधवारी घडली.

Married blood marriages | विवाहितेचा छळ करून केला खून

विवाहितेचा छळ करून केला खून


लातूर : अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील एका विवाहितेस शेतीच्या कामासाठी ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक छळ करून बुधवारी ९.३० वाजण्याच्या सुमारास या विवाहितेचा खून केल्याची घटना बुधवारी घडली.
कोपरा येथील कांचन गणपती गच्चे (वय २४) यांना पती गणपती धर्माजी गच्चे याने शेतीच्या कामासाठी ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच बुधवारी ९.३० वाजण्याच्या सुमारास विवाहितेचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी संतोष अर्जुन पंडित (रा. तुपा, जि. नांदेड) यांनी किनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती गणपती गच्चे व अन्य दोघे (रा. कोपरा) यांच्याविरुद्ध कलम ३०२, ४९८ (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Married blood marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.