मेकअपसाठी विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: December 24, 2016 21:54 IST2016-12-24T21:51:39+5:302016-12-24T21:54:37+5:30

माजलगाव : नटण्यासाठी पतीने मेकअपचे साहित्य आणले नाही म्हणून एका विवाहितेने आपले जीवन संपवले

Marriage Suicide for Makeup | मेकअपसाठी विवाहितेची आत्महत्या

मेकअपसाठी विवाहितेची आत्महत्या

माजलगाव : नटण्यासाठी पतीने मेकअपचे साहित्य आणले नाही म्हणून एका विवाहितेने आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी शिंपेटाकळी येथे उघडकीस आली.
मंगल राम बागल (३०) असे त्या विवाहितेचे नाव आहे. तिने पतीला मेकअप साहित्य आणण्यास सांगितले होते; परंतु पतीने ते आणले नाही. त्यानंतर तिचा पतीसोबत कडाक्याचा वाद झाला. दोन दिवसांपूर्वी तिने विषारी द्रव प्राशन केले होते.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना तिने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी पती राम बागल यांच्या खबरीवरुन ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ पंडित खोडवे करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage Suicide for Makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.