विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: May 22, 2016 00:02 IST2016-05-21T23:46:38+5:302016-05-22T00:02:14+5:30
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील गुजनूर येथील एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

विवाहितेची आत्महत्या
नळदुर्ग : तुळजापूर
तालुक्यातील गुजनूर येथील एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरगापूर येथील निशा पुंडलीक गायकवाड (वय-२३) ही विवाहिता आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माहेरी गुजनूर येथे आली होती़ मात्र, शनिवारी दुपारी घरात कोणी नसल्याचे पाहून त्या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली़ याबाबत दुधाजी शिवा वाघमारे (रा़ गजनूर ता़तुळजापूर) यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोहेकॉ गोपाळ घारगे हे करीत आहेत़ मयत निशा गायकवाड हिच्या पश्चात पती, लहान मुलं, सासू-सासरे, आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे़ (वार्ताहर)