विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: September 26, 2016 00:14 IST2016-09-25T23:40:29+5:302016-09-26T00:14:16+5:30

बीड : तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे सासरच्यांनी केलेल्या छळास कंटाळून शीला दिलीप नलावडे (३५) या विवाहितेने विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी घडली.

Marriage Suicide | विवाहितेची आत्महत्या

विवाहितेची आत्महत्या

बीड : तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे सासरच्यांनी केलेल्या छळास कंटाळून शीला दिलीप नलावडे (३५) या विवाहितेने विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी घडली.
बैलजोडीसाठी माहेरहून ५० हजार रुपये आणत नाही म्हणून तिचा छळ सुरु होता. तिच्या चारित्र्यावरही सासरच्यांनी संशय घेतला. त्यामुळे शीला निराश झाली होती. यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी तिने विषारी द्रव प्राशन केले. उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोक हरिश्चंद्र हाकाळे (रा. तांदळा ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण ठाण्यात पती दिलीप व सासरा निवृत्ती नलावडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन गुन्हा नोंद आहे. तपास फौजदार बालाजी ढगारे करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.