लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: June 2, 2016 23:23 IST2016-06-02T23:11:46+5:302016-06-02T23:23:48+5:30

लोहा/ माळाकोळी : लग्नाचे आमिष दाखवून मागील तीन वर्षापासून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस इतर दोघांविरूद्ध माळाकोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला़

Marriage rape by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

लोहा/ माळाकोळी : लग्नाचे आमिष दाखवून मागील तीन वर्षापासून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस इतर दोघांविरूद्ध माळाकोळी पोलिसांनी गुन्हा नोंदविला़
आरोपीला इतर दोघांनी याकामी सहकार्य केले़ २०१३ मध्ये आरोपीने लग्नास आमिष दाखवून तरुणीला झुलवत ठेवले. मधल्या काळात तरुणीला पुणे येथे वाहकाची नोकरी लागल्यावर आरोपी मंगेश कांबळे याने तिच्या शेजारी रुम घेऊन राहू लागला. या दरम्यानही त्याने तिच्यावर बलात्कार केला. यातून तरुणीला गर्भधारणा झाली. आरोपी मंगेश, गणपती कांबळे, जानकाबाई कांबळे यांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीने तरुणीसोबतच्या संबंधाची व्हिडीओ क्लिप तयार करुन ती प्रसारीत करण्याचीही धमकी दिली. या त्रासास कंटाळून अखेर युवतीने माळाकोळी ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी मंगेश, गणपती, जानकाबाई हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पो.नि. सुभाष राठोड, सपोनि किरण पवार, पोकाँ आरदवाड, महिला पोकॉ गुट्टे आदी तपास करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Marriage rape by showing lover of marriage