लग्नाचे आमिष दाखवून जवानाने केला बलात्कार

By Admin | Updated: January 17, 2016 00:06 IST2016-01-16T23:56:00+5:302016-01-17T00:06:04+5:30

औरंगाबाद : एका २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.

Marriage rape rape | लग्नाचे आमिष दाखवून जवानाने केला बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून जवानाने केला बलात्कार

औरंगाबाद : एका २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने बलात्कार केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामसिंग शिवसिंग बारवाल (२४, रा. भिलदरी, पिशोर, ता. कन्नड), असे आरोपी जवानाचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी यांनी सांगितले की, वैजापूर तालुक्यातील महाविद्यालयीन युवती शिक्षणासाठी बहिणीसह हडको एन-१२, नवजीवन कॉलनी भागात राहते. अंदाजे जुलै महिन्यात नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यात तिची आरोपी रामसिंग बारवाल याच्याशी ओळख झाली. त्याने एसआरपीएफमध्ये जवान असल्याचे तिला सांगितल्याने त्यांच्या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. याच ओळखीतून आरोपी रामसिंग याने पीडित युवतीला हडकोतील आपल्या चुलत भावाच्या घरी बोलावून घेतले. येथे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. पुढे त्याने अनेक वेळा लग्नाचे आमिष

Web Title: Marriage rape rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.