शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग निदान करण्यासाठी विवाहितेचा छळ

By admin | Updated: August 10, 2015 00:58 IST

बीड : गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही मुलगाच हवा असा अट्टहास कायम असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे

बीड : गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही मुलगाच हवा असा अट्टहास कायम असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. माजलगाव येथील शासकीय नोकरदार महिलेचा सासरच्यांनीच गर्भलिंग निदान करण्यासाठी तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजलगाव ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात झाला आहे.परभणी जिल्ह्यातील वनिता (नाव बदलले आहे) या कृषी सहायक कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा माजलगाव येथील रविकिरण विश्वनाथ वाघमारे यांच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली होती. दिराला नौकरीला लावण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन यासाठी तिचा छळ सुरू होता. त्यातच वनिता गरोदर राहिल्या. तिच्या पोटात मुलगी आहे का मुलगा ? मुलगी असेल तर आम्हाला नको आहे, असे तिला वारंवार सांगण्यात येत होते. वनिता सोनोग्राफी करण्यास तयार नव्हती त्यामुळे तिच्या छळात दिवसेंदिवस वाढ होत गेली.वनिता सासरच्या मंडळींना वारंवार विरोध करीत असल्यामुळे सासरच्यांनी तिचा छळ करून शेवटी घरातून हाकलून दिले. त्यामुळे वनिताने माजलगाव शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रविकिरण विश्वनाथ वाघमारे (नवरा), विश्वनाथ विठ्ठल वाघमारे (सासरा), दैवशाला विश्वनाथ वाघमारे (सासू), प्रज्ञा विश्वनाथ वाघमारे (नणंद), अमोल विश्वनाथ वाघमारे (दीर) यांच्याविरूद्ध कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)माजलगाव येथे घडलेल्या घटनेवरून मुलगा पाहिजे असल्याची मानसिकता स्पष्ट होते. शासनाने मुलगी वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केलेले आहेत ते आजही कायम आहेत.४मात्र, जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलली जात नाही तोपर्यंत हा बदल होणे शक्य नाही.४मानसिकता बदलली तरच पुढील काळात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊ शकते. गर्भलिंग निदान करण्यासाठी छळ केला जात असल्याचे हे प्रकरण दाखल करण्याचे धाडस वनिताने दाखविले. अशी अनेक प्रकरणे तक्रारीद्वारे महिलांनी समोर आणणे काळाची गरज आहे.