पैशांसाठी विवाहितेचा छळ
By Admin | Updated: September 16, 2014 01:29 IST2014-09-16T00:50:16+5:302014-09-16T01:29:44+5:30
आखाडा बाळापूर : लग्नातील माहेरकडून अंगठी आणि दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी सव्वालाखाची मागणी एका विवाहितेकडे केली.

पैशांसाठी विवाहितेचा छळ
आखाडा बाळापूर : लग्नातील माहेरकडून अंगठी आणि दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी सव्वालाखाची मागणी एका विवाहितेकडे केली. दरम्यान, पतीने अन्य एका महिलेशी लग्नही करून पूर्वीच्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी १२ जणांविरूद्ध आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. १५ सप्टेंबर रोजी पूजा राहुल कांबळे हिने ही फिर्याद दिली.
कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथील पूजा हिचा विवाह राहुल भीमराव कांबळे (रा.वाघदर, ता. पुसद, जि.यवतमाळ) याच्याशी झाला. लग्नानंतर अल्पावधीतच पतीसह सासरच्या मंडळींनी माहेरी राहिलेल्या सोन्याच्या अंगठीची मागणी पूजाकडे केली. सोबत दुकान टाकण्यासाठी १ लाख २५ हजारांच्या रक्कमेसाठी तगादा लावला. दरम्यान, पती राहुल कांबळे याने आम्रपाली सिद्धार्थ इंगोले हिच्याशी लग्नही केले. तरीही पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद पूजा हिने दिली. त्यावरून बाळापूर पोलिसांनी आरोपी राहुल कांबळे, भीमराव कांबळे, भारतबाई कांबळे, मनोज कांबळे, माणिक कांबळे (रा. वाघदर, ता. पुसद), लता सुरेश कांबळे (रा. गौळ बाजार, ता. कळमनुरी), शांताबाई शिवाजी कदम (रा.बोरगाव, ता. हदगाव, जि.नांदेड), आम्रपाली सिद्धार्थ इंगोले, सिद्धार्थ इंगोले, भारतबाई इंगोले, चंद्रकांत इंगोले, दिलीप इंगोले (रा. सतारमाळ, ता. पुसद) यांच्याविरूद्ध कलम ४९८ अ, २९४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला.