लग्न करण्याच्या हेतूने तरूणीचा विनयभंग
By Admin | Updated: March 20, 2017 23:22 IST2017-03-20T23:20:11+5:302017-03-20T23:22:26+5:30
आष्टी : शाळकरी मुलीच्या घरात गोंधळ घालत तिचा विनयभंग करून लग्नाची जबरदस्ती केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह त्याच्या मित्राविरोधात आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला

लग्न करण्याच्या हेतूने तरूणीचा विनयभंग
आष्टी : मुलगी लहान असताना वडिलांनी जमविलेले लग्न तू आता माझ्यासोबत कर नसता आत्महत्या करीन, असे म्हणत सातारा (वाहेगाव) येथील एका शाळकरी मुलीच्या घरात गोंधळ घालत तिचा विनयभंग करून लग्नाची जबरदस्ती केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह त्याच्या मित्राविरोधात आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा वाहेगाव येथभल १६ वर्षीय तरूणी बाभळगाव ता. पाथरी येथे ११ वीत शिक्षण घेत
आहे. सुटीत ती वडिलांकडे (सातारा वाहेगाव, ता. परतूर) आली असता सातारा येथील रहिवासी असलेला व सध्या जालना येथे राहत असलेला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा अमोल अंकुश मिठे हा त्याचा मित्र कपिल याच्यासह १० मार्च रोजी सदर तरूणीच्या घरी रात्री ९ वाजेच्या सुमारास गेला.
तुम्ही तुमच्या मुलीचे माझ्याशी लग्न करून द्या, तुम्ही मुलगी लहान असताना माझ्या वडिलांना वचन दिलेले आहे, असे तिच्या वडिलांना म्हणत त्याने गोंधळ घातला.
यावेळी सदर तरूणीने यास विरोध केला व माझ्या वडिलांनी मी लहान असताना दिलेले वचन मला मान्य नसून मी माझ्या पसंतीनुसार लग्न करणार आहे. माझे शिक्षण सुरू आहे, असे म्हणताच त्या दोघांनी सदर तरूणीची छेड काढली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सपोनि पंकज जाधव हे करीत
आहेत. (वार्ताहर)