मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेवर अघोरी प्रयोग
By Admin | Updated: September 4, 2016 01:04 IST2016-09-04T01:01:33+5:302016-09-04T01:04:10+5:30
औरंगाबाद : सासरच्या मंडळीने तिला भूतबाधा झाल्याचे ठरवून चक्क तिच्यावर अघोरी प्रयोग केले. एका मांत्रिकाच्या मदतीने तिच्या डोक्याचे केस कापून तिला झाडूने मारहाण करण्यात आली.

मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेवर अघोरी प्रयोग
औरंगाबाद : मूल होत नाही म्हणून चक्क तिच्या सासरच्या मंडळीने तिला भूतबाधा झाल्याचे ठरवून चक्क तिच्यावर अघोरी प्रयोग केले. एका मांत्रिकाच्या मदतीने तिच्या डोक्याचे केस कापून तिला झाडूने मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर माहेराहून दोन लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला. जिन्सी पोलिसांनी मांत्रिकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
अय्याज नवाब शेख, दीर फय्याज, गुलामनबी, साहेबलाल शेख, मांत्रिक इकबाल हकीम बाबा आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी तक्रारदार पीडितेचा आरोपी अय्याज सोबत विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर आरोपींनी कलरचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला. एवढेच नव्हे तर तिच्यावर कोणीतरी जादूटोणा केल्यानेच तिला मूलबाळ होत नाही, अशी आरोपींनी समजूत करून घेतली. आरोपी साहेबलाल आणि मांत्रिक इक्बाल बाबा याने तर अन्य आरोपींना याबाबत फूस लावली. मांत्रिकाच्या सांगण्यानुसार त्यांनी चक्क तिच्यावर जादूचे अघोरी प्रयोग केले. आरोपींचा हा जाच असह्य झाल्याने शेवटी तिने माहेरी जाऊन माहिती दिली. माहेरच्या मदतीने तिने थेट जिन्सी पोलीस ठाणे गाठून अघोरी कृत्य करणाऱ्या मांत्रिकांसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.