नांदलगावमध्ये विवाहितेचा जळून मृत्यू; पती, सासूविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: March 31, 2015 00:40 IST2015-03-31T00:18:56+5:302015-03-31T00:40:21+5:30

बिडकीन : नांदलगाव येथील विवाहिता नंदाबाई प्रल्हाद मुळे (३३) ही २८ मार्च रोजी जळाल्याने तिला घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Marriage burnt in Nandalgaon; Offense against husband, mother-in-law | नांदलगावमध्ये विवाहितेचा जळून मृत्यू; पती, सासूविरुद्ध गुन्हा

नांदलगावमध्ये विवाहितेचा जळून मृत्यू; पती, सासूविरुद्ध गुन्हा


बिडकीन : नांदलगाव येथील विवाहिता नंदाबाई प्रल्हाद मुळे (३३) ही २८ मार्च रोजी जळाल्याने तिला घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती व सासूविरुद्ध बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रल्हाद उत्तम मुळे व सासू प्रयागाबाई उत्तम मुळे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत बिडकीन पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून व सुशीला आसाराम गरड (रा. इंदिरानगर, पैठण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदाबाई हिच्या मृत्यूस तिचा पती व सासू जबाबदार आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासास व सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून नंदाने २८ मार्चच्या रात्री राहत्या घरी जाळून घेतले. यात तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पती प्रल्हाद उत्तम मुळे व सासू प्रयागाबाई उत्तम मुळे यांच्या विरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास स.पो.नि. प्रमोद भातनाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वामन बेले करीत आहेत.

Web Title: Marriage burnt in Nandalgaon; Offense against husband, mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.